Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18: भाजपचा ‘फायर ब्रँड’ नेता; कोण आहे ‘बिग बॉस १८’च्या...

Bigg Boss 18: भाजपचा ‘फायर ब्रँड’ नेता; कोण आहे ‘बिग बॉस १८’च्या घरातील तजिंदर पाल सिंह बग्गा?

Bigg Boss 18: भाजपचा ‘फायर ब्रँड’ नेता; कोण आहे ‘बिग बॉस १८’च्या घरातील तजिंदर पाल सिंह बग्गा?

[ad_1]

Bigg Boss 18 Contestant Tajinder Pal Singh Bagga: बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याचा लोकप्रिय टीव्ही रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ सुरू झाला आहे. चाहत पांडे, शिल्पा शिरोडकर, शहजादा धामी, अविनाश मिश्रा या कलाकारांसह तजिंदर पाल सिंह बग्गा हे देखील या शोचा एक भाग बनले आहेत. तजिंदर पाल सिंह बग्गा हे भाजपचे नेते असून, ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात. प्रत्येक मुद्द्यावर आपले बेधडक मत मांडत असल्यामुळे ते प्रचंड प्रसिद्ध आहेत. तजिंदर पाल सिंह बग्गा यांचा जन्म २४ सप्टेंबर १९८५ रोजी झाला. ते दिल्लीतील टिळक नगर येथील रहिवासी आहेत. जर, त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केलेले नाही. मात्र, त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU), दिल्ली येथून बॅचलर प्रिपरेटरी प्रोग्राम ही पदवी घेतली. हा कोर्स अशा लोकांसाठी आहे ज्यांना ग्रॅज्युएशन करण्याची इच्छा आहे, परंतु ते १२वी उत्तीर्ण झालेले नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments