Monday, September 14, 2026
Homeसाताराआमदार बदलाचा निर्धार! प्रदीप झणझणे यांचा भाजपात प्रवेश

आमदार बदलाचा निर्धार! प्रदीप झणझणे यांचा भाजपात प्रवेश

“आमदार बदलायाचाय” ट्रेंड व्हायरल करणारे शिवसेना उबाठा गटाचे नेते प्रदीप झणझणे यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सुरवडी, फलटण: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. झणझणे यांनी फलटण-कोरेगाव मतदारसंघात “आमदार बदलायाचाय” हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यांच्या या भूमिकेला फलटणच्या राजकारणात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, राजेंद्र काकडे, विकारांत झणझणे, विशाल नलवडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदीप झणझणे यांनी शेतकऱ्यांच्या डीपी संदर्भातील अनेक प्रश्न सोडवले असून ते शेतकरी व शेतमजुरांसाठी लढणारे कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. शिवसेना उबाठा गट सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना त्यांनी सांगितले की, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचा विकास होत आहे आणि लोकांचा भाजपावर विश्वास आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments