Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रधम्म लिपी गौरव दिन व अनागरिक धम्मपाल जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

धम्म लिपी गौरव दिन व अनागरिक धम्मपाल जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी, पुणे: संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूहाच्या वतीने धम्म लिपी गौरव दिन आणि अनागरिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 22 सप्टेंबर 2024 रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भिमसृष्टी, पिंपरी येथे कार्यक्रम होणार असून वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 6 अशी ठरविण्यात आली आहे.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ लेणी संवर्धक आणि अभ्यासक मा. सुरज रतन जगताप उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या वर्धापन दिनाचा प्रथम वध मोहळा म्हणून या महत्त्वाच्या दिनाचे विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने मा. सारिका कांबळे यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात अल्पोपहाराने होईल, त्यानंतर प्रस्तावना मा. संगिता भंडारे करतील. मा. प्रा. आनंद देवडेकर, केंद्रीय कार्याध्यक्ष अपरान्त साहित्यकला प्रबोधिनी, हे देखील या वेळी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने होईल, ज्यात मा. अर्चना लगड व मा. पुजा वैद्य ह्या सहभागी होतील.

संयोजन समिती:

छाया बोसरे, रेखा काटे, वंदना इंगोले, अर्चना खंडारे, आशा कांबळे, राणी सोनवणे, सारिका अस्वरे, विद्या कदम, राधिका घोडके, ज्योति निकाळजे, अर्चना गडांकुश, विजया नागटिळक, अलका नगराळे, सुनिता जगताप, कुसुम वाघमारे, वेदिका कांबळे, पल्लवी ननवरे, सुजाता सोनकांबळे, योगिता कांबळे, डॉ. इंदिरा वाय, डॉ. उज्वला बेंदे, डॉ. रसिका वायमारे, मनिषा धिवार, आम्रपाली गायकवाड, विद्या पठारे, प्रियांका डापसे, कविता गजभिये, अंजली बनसोडे, दैव शिलाताई, छाया रणदिवे, छाया गायकवाड, सरिता वासनिक, अरुणा बोरसे, छाया चौरपगारे, रेखा गायकवाड, वैशाली कडाळे, मीना शेंडगे, माधुरी गायकवाड, रोहिणी गायकवाड, शिल्पा सोनवणे, कांचन शिरसाट, प्रमिला पाटोळे, रेश्मा अडसुळ, स्नेहा ओव्हाळ.

आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाचा सन्मान वाढवा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments