[ad_1]
Kaun Banega Crorepati 16: बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोच्या १६व्या सीझनमध्ये दिसत आहेत. या शोमधून त्यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. याही वेळी प्रेक्षक या शोला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये, दिल्लीतून शालिनी शर्मा नावाची एक स्पर्धक आली होती. शालिनी यांचा १८ वर्षांचा मुलगा बेडवरून देखील उठू शकत नाही. त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून, बरे होण्याची शाश्वती नाही. शालिनीने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, ती हॉट सीटवर बसण्यासाठी दिल्लीहून अनवाणी आली होती. तिची ही कहाणी ऐकून अमिताभ बच्चन यांचेही डोळे पाणावले. शालिनीने शोमधून २५ लाख रुपये जिंकले. परंतु, ती ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. तो प्रश्न काय होता ते जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
