
टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावणारी सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग.’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतून जुईने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. पण जुईची प्रकृती ही गेल्या काही महिन्यांपासून ठीक नसल्याचे समोर आले होते. आता जुई रुग्णालयात दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.







