
फलटण : फलटण कोरेगाव मतदारसंघ अनुसूचीत जाती साठी राखीव होऊन 15 वर्षे (3 पंचवार्षिक) झाली यामध्ये आंबेडकरी समाजाचा आमदार अद्याप झाला नाही यासाठी गेली महिन्यापासून यावेळी आपला आमदार व्हावा. याबाबत चर्चा विविध माध्यमावर होऊ लागली होत होती. यापुढे जाऊन विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी शनिवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 11 वा. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन फलटण येथे सामाजिक महा बैठकीचे आयोजित केली आहे. तरी या बैठकीत होणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी 12 जुलै रोजी निमंत्रक बैठक फलटण येथील शासकीय विश्रामगृहावर संपन्न झाली या वेळी माजी नगरसेवक विविध पक्ष संघटनेचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.








