Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रNashik Accident : अवैध मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजच्या कारचा...

Nashik Accident : अवैध मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजच्या कारचा भीषण अपघात; १ ठार, २ जखमी

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मध्यरात्री घडली. एका वाहनातून गुजरात येथून नाशिक येथे अवैधरित्या मद्यसाठ्याची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार चांदवड-मनमाड मार्गावर सापळा रचण्यात आला होता. मात्र, ही वाहन भरधाव वेगात पुढे गेल्याने उत्पादन शुक्लच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पुढे मागे असा खेळ सुरू असतांना तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसांच्या गाडीला कट मारला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्यावर उलटली. हा अपघात हरनूल टोलनाक्याजवळ घडला. जखमी राहुल पवार यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहे. तर दरम्यान, मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments