फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व देणार का ;असा प्रश्न आता बौद्ध समाजातून उपस्थिती केला जात आहे

0
23
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व देणार का ;असा प्रश्न आता बौद्ध समाजातून उपस्थिती केला जात आहे

फलटण : भारतीय संविधानाने आपल्या देशातील नागरिकांना त्यांचे प्रतिनिधी म्हणजे उमेदवार निवडण्यासाठी आणि प्रतिनिधी म्हणजेच उमेदवार म्हणून निवडून येण्याची समान संधी व अधिकार संविधानाने दिला आहे . परतू फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात बौद्ध समाजाला प्रतिनिधीत्व करण्याची समान संधी आणि अधिकार येथील राजकीय पक्ष कधी देणार आहेत का? असा प्रश्न आता बौद्ध समाजातून उपस्थिती केला जात आहे

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आता ह्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत बौद्ध समाजाचा आमदार करा;अशी मागणी सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत. जो कोणता पक्ष बौद्ध सामजाचा उमेदवार देईल; त्याच्या सोबतच मतदारसंघातील सर्व बौद्ध समाज असेल; असे मत सुद्धा व्यक्त केले जात आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघ बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व देणार का फक्त बौद्ध समाजाची मते घेणार सातारा जिल्ह्यातील फलटण-कोरेगाव २५५ मतदार संघ हा आरक्षित मतदारसंघ या ठिकाणी अनुसूचित जाती(SC )साठी आरक्षित असून या ठिकाणी गेली पंधरा वर्षे अनुसूचित जाती समाजाला पंधरा वर्षे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली परंतु अशी संधी देखील बौद्ध समाजाला मिळायला हवी अशी मागणी फलटण तालुक्यासह इतर ठिकाणी सर्व दलित संघटना यांच्या वतीने जोर धरू लागली आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा या आरक्षित मतदारसंघातून या वर्षीचा आमदार हा बौद्ध समाजाचा असावा अशी मागणी फलटण कोरेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातून होऊ लागली आहे व बौद्ध समाजाचा उमेदवार असावा या चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये असे बोलले जात आहे की बौद्ध समाजाची विधानसभेला फक्त मते घेतली जात आहे की काय? बौद्ध समाजाला यावर्षी तरी प्रतिनिधित्व करण्याची संधी कोणत्याही राजकीय पक्षाकडून मिळायला हवी जो राजकीय पक्ष बौद्ध समाजाला विधानसभेत फलटण तालुक्यातून विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल त्या राजकीय पक्षाला बौद्ध समाज सह इतर दलित समाजातील संघटना पाठिंबा असेल असे फलटण तालुक्यातील गावागावातून चर्चा होत आहे.फलटण कोरेगाव आरक्षित विधानसभा राखीव मतदारसंघाची शेवटची आरक्षित राखीव मतदारसंघासाठी निवडणूक असेल यानंतर अनुसूचित जातीचा बौद्ध समाजाचा आमदार कधी होईल हे सांगू शकत नाही त्यामुळे अजून एकही आमदार बौद्ध समाजाचा लाभलेला नाही त्यामुळे ही राखीव जागेची शेवटची निवडणूक बौद्ध समाजासाठी व्हावे व बौद्ध आमदार निवडून यावा यासाठी फलटण तालुका व इतर जिल्हास्तरावरून जोरदार मागणी होत आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघ विधानसभेवर जो बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल त्या राजकीय पक्षाला किंवा त्या राजकीय नेत्याला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाज त्याच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिल

सन २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. त्यापूर्वी फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघ होता. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून हा मतदारसंघ हा अनुसूचित जाती साठी राखीव करण्यात आला आहे. सन २००९ सालापासून श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात दीपक चव्हाण हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

अनुसूचित जातीमध्ये अनेक जातींचा समावेश आहे. त्यामध्ये आता २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आता बौद्ध समाजाचा आमदार करा; अशी मागणी जोर धरू लागली आहे. २०२६साली मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याच्या चर्चा सुद्धा दबक्या आवाजात फलटण – कोरेगाव मतदारसंघात सुरू आहेत. त्यामुळे असे जर झाले तर आता म्हणजेच 2024 साली होणारी ही निवडणूक ही अनुसूचित जातीसाठी राखीव म्हणून शेवटची निवडणूक ठरू शकते.