Celebrate Cinema Lovers Day 2024: अवघ्या ९९ रुपयांत चित्रपट पाहण्याची सुवर्ण संधी! कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?

0
14
Celebrate Cinema Lovers Day 2024: अवघ्या ९९ रुपयांत चित्रपट पाहण्याची सुवर्ण संधी! कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट?


पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस इंडिया, मिरज सिनेमाज, मुल्टा ए २ आणि मूव्हीमॅक्स सह टॉप मल्टिप्लेक्स चेन या मोहिमेत सहभागी होत आहेत. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एमएआय) प्रमुख आणि पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमल ज्ञानचंदानी यांनी  जाहीर केले की, ‘एकूण ४००० स्क्रीनसह हा व्यापक उपक्रम असणार आहे, ज्या अंतर्गत चित्रपटाची तिकिटे प्रत्येकी ९९ रुपयांमध्ये उपलब्ध असतील. मात्र, रेक्लायनरसारखे प्रीमियम फॉरमॅट यातून वगळण्यात आले आहेत. तरी यातील ९० ते ९५ टक्के जागा ९९ रुपयांत मिळणार आहेत. अनेक सिंगल स्क्रीन्स थिएटर यात सहभागी होणार आहेत. अनेक सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये ९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत तिकिटे दिली जाणार आहेत. अवघ्या ७० रुपयांमध्ये देखील ही तिकिटे मिळू शकतात.’  



Source link