Thursday, August 27, 2026
Homeसातारामहानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फलटण येथे घोडयाची यात्रा भाविकांनी...

महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फलटण येथे घोडयाची यात्रा भाविकांनी यात्रेसाठी मोठी गर्दी केली

फलटण, दि. ३० एप्रिल : येथील श्री चक्रपाणी वार्षिक यात्रेच्या घोड्याची यात्रा मुख्य दिवशी ढोल, लेझीम, बेंजोच्या निनादात गोपालकृष्ण महाराज आणि श्री चक्रपाणी स्वामींच्या नावाचा जयघोष करत गुलालाच्या उधळणीत मोठ्या उत्साही वातावरणात श्रींच्या पालखीसह मानाच्या पितळी घोड्यांची ग्रामप्रदक्षिणा पार पडली.

महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फलटण येथे श्रीकृष्णनाथ, श्री आबासाहेब, श्री बाबासाहेब, अवस्थान मंदिर, रंगशीळा, श्रीदत्त या मंदिरांमध्ये यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, हिमाचल, तेलंगणा, राजस्थान, गुजरात राज्यातून आलेल्या भाविकांनी यात्रेसाठी मोठी गर्दी केली

सकाळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर माजी नगरसेवक अनुप शहा, माजी नगरसेविका मंगलादेवी निंबाळकर, विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते महास्थानाची व पालखीची पूजा करण्यात आली. त्यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, ट्रस्टी, निखिल उपाध्ये, सुमित चोरमले, रमेश

मठपती, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व भक्त उपस्थित होते. दुपारी १ वाजता महास्थानाचे व पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर आरती. त्यानंतर दुपारी १.३० वाजता पालखीसह ग्रामप्रदक्षिणा सुरू झाली. यावेळी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांच्यासह अन्य ट्रस्टी गण आणि संत, महंत, उपदेशी, भक्तगण मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

यात्रेच्या निमित्ताने मेवा मिठाई, खेळण्यांची त्याचप्रमाणे नारळ आणि पूजेच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रा पूर्णतः शांततेत व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.भर उन्हात लोटांगण …

श्रींची पालखी मिरवणूक सुरू होताना पालखीपुढे मानकरी डोक्यावर पितळी घोडे घेऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते. काही भक्तगण श्रींच्या भक्तिरसात तल्लीन होऊन पालखी समोर भर उन्हात लोटांगण घेत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments