Thursday, August 27, 2026
Homeसातारामोठी बातमी : साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची...

मोठी बातमी : साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

मोठी बातमी : साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

[ad_1]

नवी मुंबई : महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सातारा लोकसभेचे उमेदवार (Satara Lok Sabha Candidate) शशिकांद शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा गुन्हा दाखल आहे. शौचालय घोटाळ्याचा (Navi Mumbai APMC Scam) गुन्हा दाखल असतानाच एफएसआय प्रकरणात (FSI Case) दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार

एपीएमसी पोलीस ठाण्यात 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. मसाला मार्केटमधील 466 गाळे धारकांना जादाचा एमएसआय देताना एपीएमसी प्रशासनाचे 65 कोटी रूपयांचे नुकसान केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

2009 साली मसाला मार्केट मधील 466 गाळेधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी 600 रूपये प्रति चौरस फुटाने परवानगी त्या वेळच्या संचालक मंडळाने दिली होती. रेडीरेकनरचा दर 3066 रूपये असताना फक्त 600 रूपये आकारले गेल्याने शासनाचे 62 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  

25 जणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

याप्रकरणी शासनाने त्या वेळच्या संचालक मंडळातील 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशीतील मुंबई कृर्षी उत्पन्न बाजार समितीच्या 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांवर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शशिकांत शिंदे सह इतर संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे, अशी मोठी बातमी समोर आली आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments