
गेल्या काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा चर्चेत आहे. त्याने ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. निलेश साबळेचा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा कार्यक्रम येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या कार्यक्रमाचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणून धरली आहे.








