Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनसिद्धार्थ चांदेकर याची चिन्मय मांडलेकर याला विनंती, ट्रोलर्सवर संतापून केली पोस्ट

सिद्धार्थ चांदेकर याची चिन्मय मांडलेकर याला विनंती, ट्रोलर्सवर संतापून केली पोस्ट

सिद्धार्थ चांदेकर याची चिन्मय मांडलेकर याला विनंती, ट्रोलर्सवर संतापून केली पोस्ट

[ad_1]

काय आहे चिन्मयचा व्हिडीओ?

गेल्या काही दिवसांपासून सतत चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हे ट्रोलिंग त्याच्या कामामुळे होत नाही, तर त्याच्या मुलाच्या नावावरून होत आहे. नुकताच त्याच्या पत्नीने म्हणजेच नेहा जोशी-मांडलेकर हिने देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने देखील याच मुद्द्यावर संताप व्यक्त केला होता. नेहाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता चिन्मयने देखील एक व्हिडीओ शेअर करत मोठा निर्णय घेतला असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. ‘तुम्ही मला माझ्या कामावरून वाटेल तसे बोला, मी ऐकून घ्यायला तयार आहे. पण, उगाचच चुकीचा विषय घेऊन माझ्या कुटुंबावर आणि त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मी वठवलेल्या भूमिका तुम्हाला आवडल्या किंवा नाही आवडल्या त्याविषयी जे म्हणाल ते मी ऐकून घेईन. पण, आता माझ्या मुलाच्या नावावरून आणि माझ्या पत्नीच्या चरित्र्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जाताना दिसत आहेत. एक माणूस म्हणून मला या गोष्टीचे फार वाईट वाटते. आजवर मी अनेक भूमिका साकारल्या. मात्र, माझ्या भूमिकांमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल तर तो मला अजिबात मान्य नाही. म्हणूनच मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे’ असे चिन्मय व्हिडीओमध्ये म्हणाला.
वाचा: ‘तारक मेहता’ मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments