Wednesday, September 30, 2026
Homeसातारामालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक विकास काकडे यांचा सेवापूर्ती गौरव...

मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक विकास काकडे यांचा सेवापूर्ती गौरव सभारंभ

आपण आपल्या सेवेच्या काळात शिक्षणरुपी ज्ञानगंगेचे उपासक व प्रसारक आणि शिक्षण क्षेत्रात ज्ञानदेवतेच्या ज्ञानदानाचे तसेच शिक्षण क्षेत्राच्या पलिकडे जाऊन आपले उत्तुंग सामाजिक कार्य आपणास इतरांपासून वेगळे ठरवते. आपल्या आदर्श शिक्षक व उपप्राचार्य पदाच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम सेवानिवृत्तीच्या व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

फलटणः फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच उपप्राचार्य प्रवेशक सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने विकास काकडे (उपमुख्याध्यापक ) मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित केला होता . या कार्यक्रमासाठी फलटण कोरेगाव विधानसभेचे आमदार दिपकराव चव्हाण तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व शरद रणवरे चेअरमन शाळा समिती मालोजीराजे शेती विद्यालय , फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध संस्थांचे आजी माजी मुख्याध्यापक यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या सुरुवातील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर स्वागतगीत राजेंद्र पवार सर पद्मभूषण सुखात्मे इन्स्टिट्यूट ॲग्रीकल्चर कॉलेज फलटण यांनी केले . प्रस्ताविक व अध्यक्षिय निवड विजयकुमार लोंढे पाटील शिक्षक प्रतिनिधी , मालोजीराजे शेती विद्यालय फलटण यांनी केले , कार्यक्रमाचे अनुमोदन वैशाली कांबळे व यांनी केले .यावेळी प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले . तसेच सन्मानपत्राचे वाचन याठिकाणी करण्यात आले त्यानंतर मालोजी राजे शेती विद्यालयातील विद्यार्थीनी  कु आकांक्षा गुरव , व कुमारी अवंतिका जगताप यांनी आपले मनोगत सादर केले तसेच उपस्थिती शिक्षिका  पूनम काकडे यांनी आपले शिक्षक मनोगत व्यक्त केले तसेच मित्र परिवारातील मनोगत हे राम अहिवळे व ज्योती काकडे यांनी केले . त्यानंतर आजी माजी प्राचार्य यांनी मनोगत व्यक्त केले . यामध्ये रूपनवर सर , येवले सर , कोळेकर सर , गंगवणे सर, अहिवळे सर होते . कार्यक्रमांचे सत्कारमूर्ती असणारे विकास काकडे  उपमुख्याध्यापक , मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यामध्ये प्रमुख पाहुण्यांचे मनोगत हे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर .मा . अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा तसेच सेक्रेटरी , फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत हे आमदार दिपकराव चव्हाण फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन हे राजश्री कदम व वैशाली कांबळे यांनी केले कार्यक्रमासाठी सर्वाचे आभार हे मनोज कदम यांनी मानले

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील शेती विद्यालय शाळा समितीचे चेअरमन शरद रणवरे (बापू ) तसेच याठिकाण उपस्थिती असलेले माजी मुख्याध्यापक नवले सर व रूपनवर (सर ) सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर श्रीराम सहकारी कारखान्याचे संचालक महादेवराव माने विकास काकडे सर यांचे मामा राम अहिवळे तसेच माजी नगरसेवक हरिष काकडे ( नाना ) फलटण एज्युकेशन सोसायटीचे विविध संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी .

आपण ज्याच्या सेवापूर्ती व वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत ते विकास वसंतराव काकडे व त्यांच्या पत्नी उषाताई काकडे त्यांचे सर्व कुटुंबिय ,याठिकाणी सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्वांच्या वतीन विकास काकडे सरांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो . श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बोलताना सांगितले की विकास काकडे सर हे फलटण एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षक म्हणून नेमणूक होण्यापूर्वी पासून राजपरिवासाशी त्यांच्याशी चांगले व जिव्हाळ्याचे ऋणबंध आहेत विकास काकडे सर यांचे काका प्रल्हाद काकडे हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे अधिक्षक म्हणून सेवेत असल्यापासून श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे व काकडे परिवाराचे जिव्हाळ्याचे स्नेहबंध आहेत , तसेच त्याच विश्वासानी  विकास काकडे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व रघूनाथराजे नाईक निंबाळकर तसेच संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे नाते जोपासले आहे .याठिकाणी निवडणूकीची आचार संहिता असल्या कारणाने आपण कार्यक्रमाची परवानगी घेतली असल्याने आपण राजकारणावर जास्त बोलू शकणार नाही . येथे जमलेल्या सर्व आजी माजी मुख्याध्यापकांच्या बरोबर काम करत असताना विकास काकडे सराच्या शिकवण्याच्या बाबत कोणत्याही तक्रार कधी ही आपल्याला  आली नाही त्यांची काम करण्याची सेवाभावी वृती एकनिष्ठता प्रामाणिकपणा यामुळे त्यांना काम करताना कोणत्याही समस्या आली नाही विकास काकडे सरांनीहे सामाजिक बांधलिक जपत १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातील अनेक घटकांना एकत्र करून सामाजिक ऐक्य जपण्याचे कार्य ते उत्तम प्रकारे करत आहेत .

एक शिक्षक म्हणून आपण जेव्हा शाळेत जात असतो तेव्हा सर्व गोष्टी वेळेवर करावा लागतात शाळेत वेळेत जावे ‘लागते’ तास ही वेळेत घ्यावे लागत ‘ सर्व कामाचे नियोजन वेळेत करावे लागते , परंतू सेवानिवृत्ती नंतर सर्व दिनक्रम हा थांबलेला असतो ही खरी व्यवस्थित आहे विकास काकडे सर यांच्या सेवानिवृत्तीनंतर निर्माण झालेल्या पोकळी ही कधी भरून येणार नाही  फलटण एज्युकेशन सोसायटीची एक परंपरा आहे आदर्श संस्कृती आहे ती आपण सर्वांनी जपली पाहिजे असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले विकास काकडे सर यांच्या सेवापूर्ती गौरव सभारंभ व वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष भाषणात फलटण कोरेगाव विधानसभेचे आमदार दिपकराव चव्हाण यांनी विकास काकडे यांच्या बरोबर केलेल्या शैक्षणिक व सामाजिक सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाच्या योगदान बद्दल सांगितले त्यांनी केलेल्या कामाबद्दल गौरव उदगार काढले .

विकास वसंतराव काकडे म्हणजेच आपले सर्वांचे विकास काकडे सर. ३१ मार्च २०२४ ला आपल्या शैक्षणिक सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. वडील वसंतराव व आई प्रमिला या संस्कारीत दाम्पत्याच्या पोटी विकास काकडे सरांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. दोन भाऊ व दोन बहिणी असा मोठ्या परिवारात ते जन्माला आले. विकास काकडे सरांना सामाजिक शैक्षणिक धार्मिक गोष्टीची प्रचंड आवड असल्याने त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढव तसेच तरुणांनी उच्च विद्या विभूषित होऊन आपला व आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी आपला वेळ द्यावा असा विचार कायम व्यक्त केला. विकास काकडे सर यांनी 13 जानेवारी 1996 ला नवचैतन्य हायस्कूल गोंदवले या ठिकाणी आपल्या शैक्षणिक सेवेला सुरुवात केली.  त्या ठिकाणी सहा वर्ष शिक्षक म्हणून सेवा केली. 17 जुलै 2002 ला ते ज्योतिर्लिंग हायस्कूल आसू पवारवाडी या हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी शिक्षक म्हणून चार वर्षे सेवा केल्यानंतर 18 जुलै 2006 ला ते मुधोजी हायस्कूल फलटण येथे शिक्षक म्हणून दाखल झाले. एक जून 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत ते मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज फलटण या ठिकाणी शिक्षक ते उप मुख्याध्यापक या पदावर त्यांनी आपल्या शैक्षणिक सेवेतील शेवटची सेवा केली.

विकास काकडे सरांनी आपल्या सेवेच्या  कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी घडवले. आज ते विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. आपल्या या प्रदीर्घ सेवेमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती तथा विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी कायमच आपल्यावरती वरदहस्त ठेवला होता. त्याचप्रमाणे ज्या ज्या शाळांमध्ये त्यांनी काम केले त्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्या बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या या प्रदीर्घ सेवेमध्ये आपल्याला सर्व शिक्षक सहकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, शिक्षक मित्र व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्वच पदाधिकारी असा सर्वांचेच मार्गदर्शन व स्नेह आपल्याला कायम मिळाला असल्याचे ते आवर्जून सांगतात

हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या विकास काकडे यांनी कला क्रिडा साहित्य व स्काऊट गाईडच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे . त्यांना या कामासाठी हिंदी राष्ट्रभाषा पुणे हिंदी प्रचार व प्रसार या कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात झाले आहे ते महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड राज्यस्तरीय संघटक सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत . तसेच निरंतर शिक्षण या विभागांमध्ये विषय तज्ञ म्हणून आपलं योगदान दिले आहे . विकास काकडे यांनी कायमच सामाजिक , शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम केले आहे १९९१ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले स्मृती शताब्दी वर्षामध्ये फलटण येथील मुधोजी महाविद्यालयामध्ये शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त समितीच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन केले होत . यासाठी पुणे विद्यापीठाचे रजिस्टर नलवडे सर , मिलिंद महाविद्यालय औरंगाबादचे सोनकांबळे सर व अर्थतज्ज्ञ तथा आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक नरेंद्र जाधव , जिण आमचं या आत्मचरित्राच्या लेखिका सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले . मुधोजी महाविद्यालय फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांचं अनावर करण्यामध्ये विकास काकडे यांचे योगदान महत्त्वाचे होते

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घेऊन सुराज्याची  निर्मिती केली .भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा दिलेला संदेश, महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजनांसाठी केलेले शिक्षणाचे कार्य ,शाहू महाराजांनी आरक्षणाचा पाया रचला अशा पुरोगामी विचारधारेतून सरांनी समाजकार्याचा वसा घेतला व सर्वांशी प्रेमाने स्नेहाने मानवतेच्या भावनेतून बौद्ध धर्माची शिकवण जोपासण्याचा प्रयत्न केला या विचारानेच अनेक लोक स्नेहबंधनांमध्ये जोडले जातात या गोष्टीवर त्यांचा दृढ विश्वास होता आणि म्हणून सर्व मित्र परिवार मित्रपरिवाराशी आपुलकीने स्नेहाने ऋणानुबंध निर्माण केले आज त्यांच्या सेवापूर्ती गौरव सभारंभामध्ये  याची प्रचिती दिसून आली विकास काकडे सर यांचे अनेक मित्र परिवार म्हसवड , गोंदवले सातारा, पुणे येथून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तसेच फलटण होतील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या  विविध शाखेतून विकास काकडे यांच्यावर प्रेम करणारे शिक्षक बंधू भगिनी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना  स्नेह व्यक्त केला काकडे सर एक विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रिय व सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत आहे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत तथागत भगवान गौतम बुद्ध व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणूक फलटण शहरामध्ये प्रथम काढण्याचा मान तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीने मिळवला आहे संत महात्मे समाज सुधारक यांचे विचारधारा समाजामध्ये पोहोचवण्याचे काम या जयंती मंडळाच्या माध्यमातून झाले आहे या सामाजिक कार्यामध्ये विकास काकडे सर यांच्या सिंहाचा वाटा आहे .

महाराजा मंगल कार्यालय येथे सेवापूर्ती गौरव सभारंभ व वाढदिवस संपन्न झालेले  विकास काकडे व  उषा काकडे यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे व नातेवाईक , तसेच सर्व मित्रपरिवार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments