
पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Schedule : आयपीएलच्या 17 व्या हंगामाने वेग पकडला आहे. सर्व संघांनी प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत, परंतु याच दरम्यान बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या वेळापत्रकात बदल जाहीर केला असून बोर्डाने साखळी फेरीतील दोन सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन दोन्ही सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.





