Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai News : 'मुंबईतील झोपडपट्टीतील मजूरवर्ग ‘इलेक्टोरल बॉण्ड’ विकत घेऊ शकत नसल्याने...

Mumbai News : ‘मुंबईतील झोपडपट्टीतील मजूरवर्ग ‘इलेक्टोरल बॉण्ड’ विकत घेऊ शकत नसल्याने त्यांना हटवण्याचा घाट’

[ad_1]

मुंबईतील मिठागरांवर भाजपाचा डोळाः आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘पियुष गोयल यांनी अचानक मुंबई (उत्तर) ची जागा लढवण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांवर हुकूमशाही राजवट लागू कराल आणि त्यांना बळजबरीने खारफुटीच्या जमिनीवर नेऊन सोडाल. त्यांनाही शाश्वत विकास हवा आहे, ज्याला आम्हा सर्व मुंबईकरांचा पाठिंबा आहे. भारताच्या विकासात झोपडपट्टीवासीयांचाही मोठा हात आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर असण्याचे तुमच्या पक्षाचे आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही.’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. बिल्डर्सना फायदा व्हावा यासाठी भाजपचा मुंबईतील मिठागरांच्या जमिनींवर डोळा असून आम्ही आमच्या मिठागरांच्या जमिनींचं बिल्डर लॉबीपासून संरक्षण करू, असं ठाकरे म्हणाले. सध्याच्या राजवटीचा हेतू ‘गरीबी हटाओ’ नसून ‘गरीब को हटाओ’ असा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments