‘माहेरची साडी’नंतर विजय कोंडके घेऊन येणार नवा सिनेमा, ३४ वर्षानंतर पुनरागमन

0
16
‘माहेरची साडी’नंतर विजय कोंडके घेऊन येणार नवा सिनेमा, ३४ वर्षानंतर पुनरागमन


मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या नावाची चर्चा सुरु झाली की सर्वात आधी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख केला जातो. या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. तसेच त्यांच्यासोबत अजिंक्य देव, रमेश भाटकर, विक्रम गोखले, विजय चव्हाण हे कलाकार होते. या चित्रपटाने त्यावेळी कमाईच्या बाबतील ‘शोले’ चित्रपटालाही मागे टाकले होते. ‘माहेरची साडी’ हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले होते. त्यांच्या दिग्दर्शनची त्यावेळी विशेष चर्चा रंगली होती. आता विजय कोंडके यांचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.



Source link