Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रवंचित बहुजन आघाडीने आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे : प्रकाश...

वंचित बहुजन आघाडीने आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे : प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप आणि उमेदवारांवरून अद्यापही खल सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. तसंच पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांसाठी आंबेडकर यांनी वंचितच्या उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे  अध्यक्ष प्रकाश आंबडेकर  यांनी अखेर आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. त्याशिवाय, सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटले. आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी 7 उमेदवारांची घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटालाही धक्का दिला आहे. सांगलीमध्ये वंचितने ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. ↑

प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र, आता ही बोलणी फिस्कटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली.

प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र, आता ही बोलणी फिस्कटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली.

प्रकाश आंबेडकरांनी एकूण 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच, मनोज जा त्यांच्या उमेदवारांबाबत 30 एप्रिलनंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments