Monday, October 5, 2026
Homeक्रीडाGT vs MI : मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का; नमन धीर २० धावांवर...

GT vs MI : मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का; नमन धीर २० धावांवर बाद | पुढारी

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 हंगामातील पाचवा सामना आज (दि.२४) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 

मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का; नमन धीर २० धावांवर बाद

मुंबईला दुसरा धक्का ३० धावांवर बसला. इशान किशननंतर फलंदाजीला आलेला नमन धीर २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. ५ षटकांमध्ये २ गडी गमावत गुजरातने  ४७ धावा केल्या आहेत.

 मुंबईची खराब सुरूवात; ईशान किशन शुन्यावर आऊट

पहिल्याच षटकात मुंबईची खराब सुरूवात झाली. फलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आलेला ईशान किशन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला अजमतुल्ला उमरझाईने यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या हाती झेलबाद केले.

गुजरातचे मुंबईसमोर १६९ धावांचे आव्हान

गुजरातने मुंबई इंडियन्सविरुद्ध २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. मुंबईला विजयासाठी १६९ धावा कराव्या लागतील. या सामन्यात जसप्रीत बुमराह सर्वोत्तम ठरला. त्याने चार षटकात १४ धावा दिल्या आणि तीन बळी घेतले.

 गुजरातला तिसरा धक्का; उमरझाई १७ धावांवर बाद

अजमतुल्ला उमरझाईच्या रूपाने गुजरातला तिसरा धक्का बसला. १२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीने टिळक वर्माच्या हाती झेल दिला. साई सुदर्शनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. त्याला एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १७ धावा करता आल्या.

गुजरातला दुसरा धक्‍का

आठव्‍या षटकात पियुष चावल्‍याने शुभमन गिलला रोहित शर्मा करवी झेलबाद केले. शुभमनने २२ चेंडूत ३ चौकार व १ षटकार पटकावत ३१ धावा केल्‍या. गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी संघाला चांगील सुरुवात करुन दिली. मात्र चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने साहा क्लीन बोल्ड केले. त्‍याने १९ धावा केल्‍या. पाच षटकांनंतर गुजरातने १ गडी गमावत ४७ धावा केल्‍या.

आजच्‍या सामन्यात मुंबई तीन परदेशी खेळाडू टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वुड यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे . तर डेव्हिड मिलर, स्पेन्सर जॉन्सन आणि अजमतुल्ला ओमरझाई हे गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments