Monday, October 5, 2026
Homeक्रीडाइमाद वसीम निवृत्ती मागे घेत पाककडून पुन्हा खेळणार | पुढारी

इमाद वसीम निवृत्ती मागे घेत पाककडून पुन्हा खेळणार | पुढारी

[ad_1]








कराची, वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाट्यमय घडामोडींमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा पीसीबी चर्चेच्या केंद्रस्थानी असून शेजार्‍यांनी विश्वचषकाच्या द़ृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला इमाद वसीम पुन्हा एकदा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात खेळताना दिसणार आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या नवव्या हंगामात शानदार कामगिरी केल्यानंतर वसीमचे संघातील वजन वाढले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-20 संघाची धुरा शाहिन शाह आफ्रिदीकडे दिली आहे.

पाकिस्तानी संघात मधल्या फळीत एकही विश्वासू खेळाडू नसल्याने अनेकदा संघाला फटका बसला आहे. त्यामुळे इमाद वसीम याला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. माजी कर्णधार बाबर आझम आणि इमाद यांच्यात वैर असल्याचे बोलले जाते. मात्र, विश्वचषकाच्या द़ृष्टीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इमाद वसीमशी चर्चा करून बोर्डाने त्याला आपला राजीनामा मागे घेण्यास सांगितले.

वसीमने म्हटले आहे की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मी माझ्या निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचार केला. आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 पर्यंत होणार्‍या टी-20 सामन्यांसाठी मी पाकिस्तानसाठी उपलब्ध असेन.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments