Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाIPL 2024 : आयपीएल परदेशात होणार?, जय शहांनी दिली मोठी अपडेट |...

IPL 2024 : आयपीएल परदेशात होणार?, जय शहांनी दिली मोठी अपडेट | पुढारी

IPL 2024 : आयपीएल परदेशात होणार?, जय शहांनी दिली मोठी अपडेट | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात लोकप्रिय लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. आयपीएल 2024 हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीयाचे सचिव जय शहा यांनी मोठी अपडेट दिली आहे. स्पर्धेचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही. दरम्यान, उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होतील, अशी चर्चा होती. मात्र, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या स्पर्धेचे उर्वरित सामने भारतातच होतील असे सांगितल्यावर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (IPL 2024)

आयपीएल भारतातच होणार

जय शहा म्हणाले, “आयपीएल परदेशात होणार नाही.” खरं तर, सोशल मीडियावर काही काळ अशी चर्चा होती की आगामी निवडणुकीमुळे बीसीसीआय ही स्पर्धा देशाबाहेर आयोजित करू शकते. असे काही होणार नाही स्पर्धेतील सर्व सामने भारतातच खेळवले जाणार आहेत. (IPL 2024)

निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या 19 एप्रिल ते 4 जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहेत. आता मतदानाच्या तारखा निश्चित झाल्यामुळे बीसीसीआय आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे.

श्रेयस अय्यर कोलकात्याला रवाना

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज श्रेयस अय्यर आज कोलकात्याला रवाना झाला. सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये अय्यरच्या उपलब्धतेबाबत विविध चर्चा होत होत्या. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतही तो पाठदुखीशी झुंजताना दिसला होता. त्याचवेळी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही तो चौथ्या आणि पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही. कोलकाता 23 मार्च रोजी ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होम मॅचने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

हेही वाचा :









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments