Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाकोल्हापूरला सर्वसाधारण विजेतेपद | पुढारी

कोल्हापूरला सर्वसाधारण विजेतेपद | पुढारी

कोल्हापूरला सर्वसाधारण विजेतेपद | पुढारी

[ad_1]








उदगीर; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने ग्रीको रोमन, फ्री स्टाईल व महिला गटात वर्चस्व गाजवीत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. पुणे व सातारा संघ उपविजेतेपदाचे मानकरी ठरले.

ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूर जिल्हा संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवीत 172 गुणांसह विजेतेपदावर मोहर उमटवली. पुणे जिल्हा संघाला 90 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर सांगलीच्या संघाला तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. फ्री स्टाईल प्रकारात कोल्हापूर शहर संघाने सर्वाधिक 135 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. पुणे शहर संघाला 130 गुणांसह दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. कोल्हापूर जिल्हा संघ 120 गुणांसह तिसर्‍या स्थानी राहिला. महिला गटात अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर जिल्हा संघाने 115 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. सातारा संघाने 105 गुणांसह दुसरा, तर सांगली संघाने 105 गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला.

तीन दिवस चाललेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सहसंचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते झाले. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दूरद़ृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. श्याम डावळे, दिनेश गुंड राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे 60 हजार, 50 हजार व 30 हजार रुपये बक्षिसांनी गौरविण्यात आले.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments