Thursday, October 1, 2026
Homeक्रीडाIPL 2024 : रोहित शर्माने चेन्नईचे नेतृत्व करावे : अंबाती रायडू |...

IPL 2024 : रोहित शर्माने चेन्नईचे नेतृत्व करावे : अंबाती रायडू | पुढारी

[ad_1]

चेन्नई, वृत्तसंस्था : ‘आयपीएल’चा (IPL 2024) 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंवर असतील. पहिले नाव रोहित शर्माचे आहे, जो यावेळी फलंदाज म्हणून मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे, तर दुसरे नाव एम. एस. धोनीचे आहे, ज्याचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. दरम्यान, ‘सीएसके’चा माजी फलंदाज अंबाती रायडूने रोहित शर्मा आणि एम. एस. धोनीबाबत मोठे विधान केले आहे. रायडू म्हणाला की, ‘रोहित शर्माला 2025 मध्ये ‘सीएसके’कडून खेळताना पाहायला आवडेल. एवढेच नाही, तर एम. एस. धोनीच्या निवृत्तीनंतर हिटमॅनने ‘सीएसके’चे नेतृत्व करावे, अशी इच्छा आहे,’ असे मत त्याने एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.

यंदाच्या ‘आयपीएल’ पूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गुजरात टायटन्सकडून ट्रेड केल्यानंतर तो मुंबई संघात आला आहे. त्यानंतर पंड्याला थेट कर्णधार करण्यात आले. यावर रायडू म्हणाला, ‘आयपीएल 2022 पूर्वी पंड्याला मुंबई इंडियन्सने सोडले होते. त्यानंतर तो गुजरात टायटन्स या नव्या संघाचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वाखाली ‘जीटी’ला पहिल्या सत्रात चॅम्पियन बनता आले, तर सलग दुसर्‍याच हंगामात संघ उपविजेता ठरला. असे असले तरी ‘एमआय’चे नेतृत्व करणे हार्दिक पंड्यासाठी सोपे नसेल.’

‘मला वाटते ‘एमआय’ने नेतृत्व बदल करण्यात घाई केली आहे. पंड्याला कर्णधार बनवण्यापेक्षा यंदाच्या हंगामात रोहितकडे नेतृत्व कायम ठेवणे गरजेचे होते. पंड्यानेही पुढच्या वर्षी कर्णधारपद स्वीकारले असते, तर बरे झाले असते. कारण, रोहित अजूनही टीम इंडियाचा कर्णधार आहे,’ असा सल्लाही त्याने यावेळी दिला. (IPL 2024)

‘रोहित पुढील 5 ते 6 वर्षे खेळू शकतो. मला त्याला भविष्यात ‘सीएसके’कडून खेळताना पाहायचे आहे. जेव्हा एम. एस. धोनी निवृत्त होईल, तेव्हा त्याने ‘सीएसके’चे कर्णधारपद स्वीकारावे, असे मला वाटते,’ असेही मत रायडूने व्यक्त केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments