[ad_1]
‘ऑस्कर २०२४’ या सोहळ्यातील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, होस्ट जिमी किमेल याने जॉन सीनाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार श्रेणीमध्ये पुरस्कार सादर करण्यासाठी आमंत्रित केल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर, सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार देणारी व्यक्ती स्वतःच कपड्यांशिवाय आली तर… असे म्हणत त्याने काही संकेतही दिले होते. मात्र, जॉन सीना कपड्यांशिवाय बाहेर मंचावर येण्यास कचरत होता. मात्र, ऑस्कर २०२४चा होस्ट किमेलने मन धरणी केल्यानंतर जॉन सीना स्टेजवर पोहोचला. यानंतर त्याने सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार विजेत्याचे नाव असलेल्या एका मोठ्या आकाराच्या लिफाफ्याने स्वतःला झाकून घेतले.
[ad_2]
Source link
