फलटण येथे घेतलेल्या या भेटीमुळे आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या राजकारणात काही वेगळे चित्र बघायला मिळणार का ?

0
15
फलटण येथे घेतलेल्या या भेटीमुळे आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या राजकारणात काही वेगळे चित्र बघायला मिळणार का ?

फलटण: फलटण येथील ” लक्ष्मी विलास पॅलेस “या निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार शशीकांत शिंदे यांच्यात फलटण येथे सुमारे एक तास कमरा बंद चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे .

सद्या राज्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी विविध नाटयमय घडामोडी घडल्या होत्या त्यामध्ये सत्या स्थापन करण्यात आली होती . त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरदचंद्र पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता . त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत . आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत आहेत . तर आमदार शशिकांत शिंदे हे शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये कार्यरत आहेत .

तसेच या भेटी वेळी फलटण तालुक्याचे आमदार दीपक चव्हाण , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती .

फलटण येथे घेतलेल्या या भेटीमुळे आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्याच्या राजकारणात काही वेगळे चित्र बघायला मिळणार का ? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.