राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या गावोगावी दौरे करत आहेत .

0
12
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे सध्या गावोगावी दौरे करत आहेत .

माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीतून निवडणूकीच पुन्हा तयारी चालू केली . तसेच सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी चे युवा नेते धैर्यशील मोहिते – पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजपा कडून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्यामुळे त्यांनीही लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे . त्याच्याच एक भाग म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघातून पायाला भिंगरी लावून फिरायला सुरुवात केली आहे . संपूर्ण लोकसभा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे २०२४ च्या लोकसभा निवडणुकी साठी माढा लोकसभा मतदारसंघातून कोणाला तिकिट द्यायचे , हा प्रश्न उभा राहिला आहे . या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत

सोलापूर जिल्ह्यातील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे असलेले धैर्यशील मोहिते – पाटील हे सध्या माढा मतदारसंघातील गावोगावी दौरे करत आहेत . माढा लोकसभा मतदार संघातून कार्यकर्ते च्या भेटी गाठी घेत आहेत . माढा लोकसभा मतदारसंघात सद्या सातारा जिल्ह्यातील काही तालुके व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके येत आहेत . यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा , करमाळा , सांगोला व माळशिरस हे चार तालुके येतात तर सातारा जिल्ह्यातील फलटण व माण खटाव हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात .

माढा लोकसभा मतदारसंघात सहा आमदार हे माढा विधानसभा मतदारसंघातून येतात . त्यामध्ये माढा मतदारसंघातून बबनराव शिंदे हे (राष्ट्रवादी पार्टीचे ) करमाळातून संजयमामा शिंदे ( अपक्ष ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा , सांगोल्यातून शहाजीबापू पाटील हे (शिवसेना ) माळशिरस मधून राम सातपुते (भाजप) तर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून दिपक चव्हाण हे (राष्ट्रवादी काँग्रेस ) माण खटाव मधून जयकुमार गोरे ( भाजप ) यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होणार आहे .

सातारा जिल्ह्यातील माण , सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हे कायम दुष्काळी तालुके म्हणून गणले जातात . सिंचनाची कामे होते असली तरी या कामाच्या वेग खूपच कमी आहे . तालुक्यात कारखाने आहेत , पण ते आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत , सुशिक्षित बेरोजगारांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे, व्यवसाय व उद्योग याठिकाणी आले नाहीत , मोठया शिक्षणाची सुविधा कमतरता याठिकाणी आहे, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे अशा अनेक कारणामुळे आहेत ज्यामुळे युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूकीत उतरण्यासाठी पायाला भिंगरी बाधून गावोगावी दौरे , भेटीगाठी वाढविल्या आहेत