तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल : वाठार फाटा

0
16
तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल : वाठार फाटा

फलटण : दि ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास वाठार फाटा गावच्या हद्दीत पोलिसांनी गाडीतून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे तलवार आढळून आली . यावेळी आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली . पोलिसांनी त्यांच्यावर बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडील टाटा मॅजिक क्र ( एम एच . ११ एल ९८ २९ )गाडी व तलवार जप्त केली आहे

अजय संजय जाधव (वय २३, राहणार मलठण, तालुका फलटण, जिल्हा सातारा) व कुमार उर्फ गोट्या तानाजी जाधव (वय २६, राहणार चौधरीवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता वाठार निंबाळकर हद्दीतील वाठार फाटा येथे आरोपी अजय संजय जाधव व कुमार उर्फ गोट्या तानाजी जाधव हे त्यांच्या ताब्यातील टाटा मॅजिक गाडीतून संशयास्पदरित्या वावरत असताना मिळून आले. यावेळी त्यांच्याकडे तलवार मिळून आली असून आरोपींकडे या हत्याराबाबत व गाडीबाबत विचारपूस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ करत आहेत