फलटण तालुक्यातील विकासामध्ये शरद पवार यांच्या हात : मंत्रीपद व सभापती पद देवून सुद्धा वनवास कसा? सुभाष शिंदे यांची सडकून टीका

0
18
फलटण तालुक्यातील विकासामध्ये शरद पवार यांच्या हात : मंत्रीपद व सभापती पद देवून सुद्धा वनवास कसा? सुभाष शिंदे यांची सडकून टीका

फलटणः मा . केद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे फलटण येथील निष्ठावान कार्यकर्ते सुभाष शिंदे यांच्या ” जिद्द ” या निवासस्थान पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषद मध्ये महाविकास आघाडीच विविध पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषदेत सुभाष शिंदे बोलत होते

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीत जो निकाल काल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला आहे . तो अतिशय निंदनीय असून ,ज्यानी पक्ष सुरु केला त्याच्याच विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निकाल दिला आहे . निवडणूक आयोगाच्या निकालावर येणाऱ्या काळात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल व त्याला सर्वोच्च न्यायालयात योग्य न्याय मिळेल .

फलटण तालुक्याला व नेत्यांना माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी भरभरून दिलेले आहे . यामध्ये सुरुवातीला मंत्रीपद दिले त्यानंतर सत्ता नसतानाही विधान परिषदेचे सभापतीपद पवार साहेबांनी मिळवून दिले आहे . फलटण तालुक्यातील विकासामध्ये शरद पवार यांच्या मोठा हात नेहमीच राहिलेला आहे . अशी सर्व परिस्थिती असतानाही , काही नेते जाहीर कार्यक्रमात सांगतात की ‘ रामाला सुद्धा वनवास भोगावा लागला होता . अशा नेत्यांना आगामी काळात जनता त्यांना त्यांची किंमत दाखवून देईल . अशी सडकून टीका शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष शिंदे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता केली

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की; आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील जो कोणी उमेदवार निवडणूक लढवेल त्याला विजयी करण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता सर्व ताकतीने काम करणार आहे.

फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी शरद पवार साहेबांच्या माध्यमातून निरा – देवधर, धोम – बलकवडी, फलटण रेल्वे असे मोठे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत. कोणीही कितीही स्वतःचे कौतुक केले तरी हे सर्व प्रकल्प पूर्णत्वास जाण्यामध्ये शरद पवार साहेबांचा आशीर्वादच नेहमी राहिलेला आहे. फलटण तालुक्यामधील विकास कामे करण्यासाठी शरद पवार साहेब नेहमीच आग्रही होते व आहेत.

नेहमी राहिलेला आहे. फलटण तालुक्यामधील विकास कामे करण्यासाठी शरद पवार साहेब नेहमीच आग्रही होते व आहेत. आगामी काळामध्ये सुद्धा फलटण तालुक्यात विकासात्मक कामे करण्यासाठी पवार साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वजण कार्यरत राहू; असे मत यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.