प्रख्यात आंबेडकरवादी गायिका : भीमराज की बेटी मै तौ जय भीम वाली हू : किरणताई पाटकर

0
22
प्रख्यात आंबेडकरवादी गायिका : भीमराज की बेटी मै तौ जय भीम वाली हू : किरणताई पाटकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे स्मृतिशेष लोककवी सूरसम्राट नागोराव पाटणकर यांची सुकन्या बौद्ध – भीम गित गायीका “किरण पाटणकर ” यांचे नागपूर येथे अल्पशा आजाराने दिनांक 5 फेब्रुवारी 2024 ला दुपारी 12:00 वाजता निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे.

कव्वाली गीत गायनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांची परिवर्तनवादी चळवळ संपूर्ण भारतभर पोहोचवणाऱ्या दिग्गज गायिका किरण पाटणकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात कधी न । भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे

किरण पाटणकर यांनी अनेक बुद्ध-भीम गीते गायली होती. ‘भीमराज की बेटी मै तौ जयभीमवाली हूँ’ हे त्यांचे गाणे विशेष गाजले होते. नंतरच्या काळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला व २०१४ साली बहुजन समाज पार्टीतर्फे रामटेक लोकसभा निवडणूक त्यांनी लढविली होती. नागपूर महापालिकेत बसपाच्या नगरसेविका म्हणूनही त्या निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्रातील खूप मोठी हानी झाली आहे

तूम तो ठहरे… च्या मूळ गायिका

प्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांच्या आवाजातील ‘तूम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, सुबह पहले गाडीसे तुम तो चले जाओगे’, हे गाणे प्रचंड गाजले होते. नागपूरच्या मोमीनपुरा भागात राहणारे जहीर आलम यांनी हे गाणे लिहिले होते. मात्र अल्ताफ राजाच्या आवाजात हे गाणे येण्यापूर्वी अनेक वर्षे किरण पाटणकर हेच गाणे मंचावर सादर करीत होत्या.