Tharala Tar Mag 5th Feb: दारू पिऊन सायली करणार माथेरानमध्ये तमाशा? प्रियाचा डाव सफल होणार?

0
16
Tharala Tar Mag 5th Feb: दारू पिऊन सायली करणार माथेरानमध्ये तमाशा? प्रियाचा डाव सफल होणार?


अर्जुन पुन्हा देवळात जाऊन देवाकडे सायलीसाठी आनंद मागणार आहे. अर्जुन देवळात जाऊन बोलणार आहे की, ‘देवा आता तुझ्यासमोर जी मुलगी येऊन गेली, तिने सगळ्यांसाठी आनंद मागितला असेल आणि सगळ्यांची दुःख स्वतःसाठी मागितली असतील. पण देवा तिला कोणतंही दुःख देऊ नको. तिची सगळी दुःख मला दे आणि सगळा आनंद तिला दे.’ इतकं बोलून अर्जुन पुन्हा मंदिराबाहेर येणार आहे. मात्र, सायलीला अर्जुनचं हे विचित्र वागणं कळत नाहीये. त्यामुळे ती गोंधळून गेली आहे. मात्र, आता अर्जुन तिला घेऊन पुन्हा आपल्या हॉटेल रूममध्ये जाणार आहे.



Source link