
३० जानेवारी रोजी बॉबी देओल पत्नी प्रकाश कौर, आई आणि वडील धर्मेंद्र यांच्यासोबत निकिता चौधरीच्या लग्नासाठी उदयपुरला रवाना ढाला होता. जश्न हॉटेल ताज अरावली येथे त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. अभय देओलने निकिताच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत ‘दुल्हा आणि दुल्हन, देवी आणि सज्जनो.. त्यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात करताना तुमचे आशिर्वाद असणे गरजेचे आहे. मी माझ्या भाचीमध्ये एका महिलेपेक्षा जास्त एक लहान मुलीला पाहात आहे जी आज वधू बनली आहे. खरं तर हे चकीत करणारे आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. करण देओलने देखील या जोडीसोबतचा फोटो शेअर केला आहे.







