
कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे पण वास्तव आहे ! ७ डिसेंबर १५९८ साली इटली देशांमध्ये जन्माला आलेले प्रख्यात शिल्पकार , चित्रकार व वास्तुविशारद जियान लोरेन्झो बर्निनी यांनी निर्जीव संगमरवरी दगडाला देखील मानवीय देहात रूपांतरीत केले आहे.
जियान यांचे शिल्पकलेतील प्राविण्य आपल्याला पाहायचे असेल तर “The Rape of Proserpina” हे सुप्रसिद्ध शिल्प आवश्य पहा , मानवीय देहातील बारकावे इतक्या शिताफीने दगडात त्यांनी परावर्तित केले आहेत की आपल्याला विचार करायला भाग पाडतं की खरोखरच हे संगमरवरी दगड आहे का ? पुरूषाचे प्रौढ कसदार देह तर स्त्रीचे नाजुक कमनीय देह अशी दोन्ही परस्पर विरोधी देह त्यांच्या अंगी असलेली शिल्पकलेतील पारंगता यातून सिध्द होते, मूव्हमेंट गतिमानता फोर्स या सर्व बाबींवर त्यांनी जबरदस्त काम केले आहे हे शिल्प निरखून पाहतांना सहज लक्षात येतं Body anatomy चे उत्तम ज्ञान त्यांना होते हे वेगळं सांगायला नको.
हे शिल्प पाहतांना हरखून जायला होते, तुम्हाला हे शिल्प पाहून काय वाटतं हे कमेंट मधून जरूर नोंदवा…!
सूरज रतन जगताप







