Saturday, October 3, 2026
Homeक्रीडाINDvsENG Test Day 4 : इंग्लंडच्या 400 धावा पूर्ण, पोप द्विशतकाच्या उंबरठ्यावर...

INDvsENG Test Day 4 : इंग्लंडच्या 400 धावा पूर्ण, पोप द्विशतकाच्या उंबरठ्यावर | पुढारी

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (दि.28) सकाळी 9.30 वाजता सुरू झाला. इंग्लंडने आपल्या दुस-या डावात 96 षटकांत 7 बाद 401 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे 211 धावांची आघाडी मिळवली आहे.

राहुलने पोपचा झेल सोडला

केएल राहुलने दुसऱ्या स्लिपमध्ये ओली पोपचा सोपा झेल सोडला. 95 व्या षटकात मोहम्मद सिराजने ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट पिच चेंडू टाकला. पोप कट करायला गेला पण चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या राहुलकडे गेला. राहुलने झेल घेण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू हातातून सुटला. जीवदान मिळाले त्यावेळी पोप 186 धावांवर फलंदाजी करत होता. अक्षर पटेलनेही 110 धावांवर त्याचा झेल सोडला होता.

इंग्लंडच्या 400 धावा पूर्ण

इंग्लंडने 96 व्या षटकात 400 धावा पूर्ण केल्या. ओली पोपने रवी अश्विनविरुद्ध एक धाव घेत संघाला या धावसंख्येपर्यंत नेले. यासह संघाची आघाडीही 210 धावांपर्यंत वाढली.

हार्टले-पोपची अर्धशतकी भागीदारी

ओली पोपने 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टॉम हार्टलेसोबत पन्नासची भागीदारी केली. या दोघांनी यासाठी केवळ 62 चेंडू घेतले.

इंग्लंडच्या 350 धावा पूर्ण

इंग्लंडने 86व्या षटकात 350 धावा पूर्ण केल्या. रविचंद्रन अश्विनच्या षटकात एकेरी धाव घेत पोपने संघाला या धावसंख्येपर्यंत नेले. यासह इंग्लंडची आघाडीही 160 धावांपर्यंत वाढली.

इंग्लंडची सातवी विकेट

इंग्लंडची सातवी विकेट 339 धावांवर पडली. रेहान अहमद 53 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला केएस भरतकरवी विकेटच्या मागे झेलबाद केले. त्याने ओली पोपसोबत 64 धावांची भागीदारी केली. पहिल्या डावातही रेहान बुमराहचा बळी ठरला होता.

पोप-रेहान अहमदची अर्धशतकी भागिदारी

चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या षटकात लेगस्पिनर रेहान अहमदने शतकवीर ओली पोपसोबत अर्धशतक भागीदारी पूर्ण केली. जडेजाच्या विरुद्ध ३६ धावा करत त्याने हे यश मिळवले. रेहानने चौथ्या दिवशी 16 धावा करत आपला डाव सुरू ठेवला.

ओली पोपचे दीड शतक

ओली पोपने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या षटकात 150 धावा पूर्ण केल्या. जसप्रीत बुमराहविरुद्ध एकेरी धाव घेऊन त्याने 212 चेंडूत ही कामगिरी केली.

चौथ्या दिवशी इंग्लंडच्या डावाला सुरुवात

चौथ्या दिवशी इंग्लंडने त्यांचा दुसरा डाव 6 बाद 316 धावसंख्येपासून सुरू केला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. ओली पोपच्या शतकाच्या जोरावर पाहुण्या संघाने 126 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसाचे पहिले सत्र जिंकण्यात इंग्लंडला यश आले, तर भारतासाठी कठीण होईल. तिसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारत ड्रायव्हिंग सीटवर होता, मात्र तिसऱ्या सत्रात इंग्लंडने 144 धावा करत भारतासमोर अडचणी निर्माण केल्या. ऑली पोप नाबाद 148 धावांसह क्रीजवर आहे. चौथ्या दिवशी प्रथम पोपची शिकार करण्याची भारताची योजना असेल. जर टीम इंडियाने पाहुण्यांचा पहिल्या तासात ऑलआऊट केला तर त्यांना मोठे लक्ष्य मिळण्याची आशा कमी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments