
नितीश कुमार यांनी बुधवारी घराणेशाहीवरून लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. त्यानंतर बिहारचं राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. नितीश कुमार यांनी म्हटलं होतं की, आजकाल लोक आपल्या कुटुंबाला पुढं आणतात. पण, समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांनी कुटुंबाला कधी पुढं आणलं नाही. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत आम्ही कुटुंबाला राजकारणात आणलं नाही. कर्पुरी यांच्यानंतर आम्ही त्यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांना राजकारणात आणलं. सध्या राष्ट्रीय जनता दल आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये तणाव वाढला आहे.







