All The Best: मुक्या, बहिऱ्या अन् आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी; रंगमंचावर पुन्हा होणार ‘ऑल द बेस्ट’!

0
14
All The Best: मुक्या, बहिऱ्या अन् आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी; रंगमंचावर पुन्हा होणार ‘ऑल द बेस्ट’!


‘ऑल द बेस्ट’ या धमाल नाटकाने मराठी मनोरंजन विश्वाला भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर असे दिग्गज सुपरस्टार दिले. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, दीपा परब, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मुका, बहिरा व आंधळा अशा मित्रांची कथा असलेलं हे धमाल नाटक रसिकांनी चांगलंच डोक्यावर उचलून धरलं होतं. या नाटकाला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं होतं की, नाटकाच्या अधिकच्या प्रयोगांसाठी एकाच वेळी तीन टिम्स ‘ऑल द बेस्ट’चे प्रयोग करत होत्या. दर महिन्याला या नाटकाचे साठ ते सत्तर प्रयोग व्हायचे. नाटकाच्या पहिल्या पाच वर्षात तब्बल २१०० प्रयोग झाले होते.



Source link