दुधेबावी खून प्रकरणातील २ आरोपींना जन्मठेप व 3लाख रुपये दंड ,२ निर्दोष

0
13
दुधेबावी खून प्रकरणातील २ आरोपींना जन्मठेप व 3लाख रुपये दंड ,२ निर्दोष

२४ जानेवारी दि.०४/०७/२०२० रोजी दुधेबावी ता. फलटण येथे जमीन वाटपाच्या कारणावरून झालेल्या खून प्रकरणातील २ आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी रुपये ३ लाख रुपये दंडाची शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. तर २ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दोन सख्या भावांमध्ये जमिनीवरून वाद होता. हा वाद इतका वाढला की, भावाने आपल्या पत्नी व मुलांसह भावाचा खुन केला होता. न्यायालयाने पुतण्यांना दोषी मानून सक्तमजुरी व दंड ठोठावला तर भाऊ-भाऊजय यांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कुडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण दि. ०४/०७/२०२० रोजी सकाळी ०७.०० वाजण्याच्या सुमारास मौजे दुधेबावी ता. फलटण जि. सातारा गावचे हद्दीत फिर्यादी यांचे राहते घरासमोर आरोपी नामे क्र. १) हणमंत महादेव सोनवलकर वय ४८ वर्ष, क्र.२) सुनिता हणमंत सोनवलकर वय ३८ वर्ष, क्र.३) अनिकेत हणमंत सोनवलकर वय २३ वर्ष, क्र.४) शंभुराज हणमंत सोनवलकर वय २१ वर्ष सर्व रा. दुधेबावी ता. फलटण जि. सातारा यांनी मयत नामे ज्ञानदेव महादेव सोनवलकर वय ४० वर्ष रा. दुधेबावी ता. फलटण जि.सातारा यास सामाईक जमीन वाटुन देत नाही या कारणावरुन आरोपी क्र. १ व २ यांनी शिवीगाळ करुन त्यांचे हातातील लोखंडी पाईपने ज्ञानदेव सोनवलकर यांना मारहाण केली. तसेच आरोपी क्र. ३ याने त्याचे हातातील कुऱ्हाड मयताचे उजवे हाताचे दंडावर मारली व आरोपी क्र.४ याने त्याचे हातात असलेल्या लोखंडी गजाने मयताच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जखमी केले. मयत यांचे डोकीस मार लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी सुविधा हॉस्पीटल, येथे ॲडमिट केले व तेथे उपचार घेत असताना ते मयत झाले. म्हणुन वगैरे मजकुराची खबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल आहे.

सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. नितीन सावंत, पोलीस उप-निरीक्षक यु. एस. शेख फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी करुन मा. न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते.

सदरचा खटला मा.श्री.व्ही. आर. जोशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सो, सातारा यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फे श्रीमती वैशाली पाटील सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. नमुद केसमध्ये एकुण ११ साक्षीदार तपासले, केवळ परिस्थितीजन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत न्यायालयात समोर आलेला पुरावा व वकील यांचेकडील पुरावे ग्राह्य मानुन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सो सातारा यांनी आज दिनांक २४/०१/२०२४ रोजी यातील आरोपी क्र.३ व ४ यांना भा. द. वि. कलम ३०२, ३४ अन्वये जन्मठेप व रु.३,००,०००/- दंड, दंड न दिलेस १ वर्ष साधा कारावास अशी शिक्षा दिली आहे. सदर दंडाच्या रकमेपैकी रक्कम रु. ५,००,००० इतकी नुकसान भरपाई मयताच्या कुटुंबियांना देण्यात यावी. तसेच आरोपी क्र.१ व २ यांना सीआरपीसी २३५ (१) अन्वये ३०२ या शिक्षा पात्र गुन्हयासाठी निर्दोष मुक्त करणेत आले आहे.

उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस फलटण विभाग फलटण, श्री. सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन म.पो.हवा.ब.नं.२०८५ साधना कदम व पो. अंमलदार ब.नं. १६१७ बडे नेमणुक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी कामकाज पाहिले. याकामी पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस उप-निरीक्षक श्री. उदय दळवी, श्री. सुनिल सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. १९७ मंजूर मणेर, म. पो. हवा १६४४ शेख, पो. अंमलदार अमित भरते ३/६ यांनी योग्य ती मदत केली