Monday, October 5, 2026
Homeसातारासातार्‍याजवळ दोन कार जळून खाक | पुढारी

सातार्‍याजवळ दोन कार जळून खाक | पुढारी

[ad_1]








सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरालगत महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात दोन कार जळून खाक झाल्या. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली असून, कोणालाही दुखापत झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार गॅस भरत असताना ही घटना घडल्याचे समोर येत आहे. एका कारमध्ये गॅस भरताना ती पेटल्याने शेजारील उभी असलेली कारही जळाली.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, गॅसकिट असलेल्या कारमध्ये गॅस भरला जात असताना अचानक तिने पेट घेतला. यामुळे क्षणात आगडोंब उसळला. पेट घेताच परिसरातील नागरिकांची घाबरगुंडी उडाली. घटनास्थळावरून संबंधितांनी पळ काढला. एक कार पेटली असतानाच शेजारी उभ्या असलेल्या कारलाही त्या आगीची झळ बसली. पाहता पाहता क्षणात उभ्या असलेल्या दुसर्‍या कारनेही पेट घेतला. दोन्ही कारला आग लागल्यानंतर नागरिकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे वाहन पोहचले व त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ हा थरार सुरु होता. बघ्यांची परिसरात गर्दी झाली होती. अग्निशामक दलाने पाणी मारल्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र आगीत वाहने पूर्णपणे जळाल्याने वाहनांचा सांगाडा राहिला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत याची नोंद झाली नव्हती.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments