
येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.







