
नाशिकमध्ये पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर कडाडून हल्ला केला. महाराष्ट्रचे वैभव ओरबाडले जात असताना मिंधे शेपूट घालून खुर्चीसाठी चाकरी करतोय, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला होता. तसेच उद्धव ठाकरेंनी काल भगवी वस्त्रे व गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून काळाराम मंदिरात आरती केली होती. यावर शिंदेंनी खोचक टोला लगावला आहे.







