
दिग्दर्शक-निर्माते रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ८०च्या दशकामध्ये हा शो कसा बनवला गेला, प्रत्येकाने किती मेहनत घेतली हे सांगितले आहे. या मालिकेसाठी ‘हनुमान’ साकारणारे अभिनेते दारा सिंह प्रत्येक एपिसोडच्या शूटिंगदरम्यान तब्बल ९ तास काहीही न खाता उपाशी राहायचे, याची आठवण देखील त्यांनी यावेळी शेअर केली. या मालिकेसाठी त्यांचे वडील हणजेच रामानंद सागर कसे झपाटल्यासारखे काम करायचे, हे देखील त्यांनी यावेळी सांगितले.







