Sunday, August 23, 2026
Homeसाताराश्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विनंतीला मान देवून : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विनंतीला मान देवून : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणला आल्यावर श्रीराम मंदिरात येणारच

फलटणकरांचे आराध्य दैवत म्हणजेच प्रभू श्रीराम मंदिर. फलटण येथे जेव्हा जेव्हा येणार आहे; तेव्हा तेव्हा मी श्रीराम मंदिरामध्ये येऊन प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेणार आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विनंतीला मान देवून मी येथे आलो आहे; असे मत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.फलटणकरांचे आराध्यदैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी आज मनोभावे दर्शन घेतले. यावेळी प्रभू श्रीराम मंदिराच्या मंडपामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापतो तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजेनाईक निंबाळकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments