Sunday, August 23, 2026
Homeसाताराआमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतली श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर यांची भेट

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतली श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर यांची भेट

फलटण | सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज – फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याने फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची सदिच्छा भेट आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी घेतली. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांची – सदिच्छा भेट अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर घेतलेली होती. त्यानंतर काही दिवसातच आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी “आमचं ठरलंय” अशा काही चर्चा झाल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments