Mumbai Fire: मुंबईच्या विलेपार्ले येथील इमारतीला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू

0
19
Mumbai Fire: मुंबईच्या विलेपार्ले येथील इमारतीला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू रोड येथील न्यू पूनम बाग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रुम नं- २०१ ही आग लागली. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीत प्लॅटमधील इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, लाकडी फर्निचर, लाकडी दरवाजे, फॉल्स सिलिंग, घरगुती वस्तू जळून खाक झाल्या आहेत.



Source link