
अभिषेकचा आवाज ऐकून समर्थ पटकन चादरमधून बाहेर येतो आणि त्याला एक चादर देतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने कमेंट करत ‘हा किती वाईट फॅमिली शो’ आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘या दोघांना टेम्पटेशन आयलंडवर असायला हवे’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘हा असाकसा कौटुंबीक शो आहे. चीपनेसची ही तर हद्द आहे’ असे म्हटले आहे.







