Maratha Aarakshan: एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?; केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

0
23
Maratha Aarakshan: एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?; केतकी चितळेची पोस्ट चर्चेत


मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या आठव्या दिवशी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आरक्षणासाठी आमचे शांततेत आंदोलन सुरू आहे. परंतु, आंदोलकांवर सरकारकडून खोट्या केसेस दाखल करण्याचं काम सुरू आहे. मात्र याला घाबरून कोणीही आंदोलनातून माघार घेऊन नये. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल. आता माझे बोलणे कधी बंद होईल, हेच मला माहिती नाही. त्यामुळे किती वेळ हवा, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का हे येथे येवून सांगावे. आम्हाला पटलं तर त्यांना वेळ देऊ अन्यथा पाच मिनिटांचाही वेळ दिला जाणार नाही.



Source link