
रेंजुशा मेननने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. तिने ‘स्त्री’, ‘निज़ालट्टम’, ‘मैगालुडे अम्मा’ आणि ‘बालामणि’ अशा हिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रेंजुशाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ती कुटुंबीयांसोबत राहत असताना देखील रेंजुशाने इतके टोकाचे पाऊल कसे उचलले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिरुवनंतरपुरम येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.







