
पुढे करण जोहर म्हणाला की, ‘लग्न न करणे हा माझा वैयक्तिक निर्णय होता. पण, लग्नावर माझा विश्वास आहे की, नाही याबद्दल मला खूप काही सांगायचे आहे. आता मी एवढेच म्हणेन की, तुमचे मन जे सांगेल तेच करा. तुमच्यावर लग्न करण्यासाठी किंवा करिअर निवडण्यासाठी कुणाचाही दबाव पडू देऊ नका. मग ते कुटुंब असो, समाज असो, वा आजूबाजूचे लोक… तुमच्या मनाला जे वाटेल ते करा.’ करण जोहरच्या या उत्तराने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली होती. आता करण त्याच्या आयुष्याबद्दल आणखी काही खुलासे करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.








