
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून मान्सून माघारी फिरला आहे. पुढील एक ते दोन दिवसांत मुंबई आणि कोकणातूनही मान्सून माघारी फिरणार आहे. त्यामुळं पुढील काही दिवस कोकण आणि मुंबईतील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई तसेच कोकण वगळता राज्यातील अन्य भागांच्या तापमानात मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार असून थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.



