Sahakari Bank Scam : जयंत पाटलांचा भाचा अडचणीत, ईडीकडून बँक घोटाळ्याचा आरोप

0
18
Sahakari Bank Scam : जयंत पाटलांचा भाचा अडचणीत, ईडीकडून बँक घोटाळ्याचा आरोप


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये ईडीने आणखी १४ लोकांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे, प्रसाद सागर, कॉंग्रेस नेते रणजीत देशमुख, सुभाष देशमुख, अरविंद खोतकर यांच्यासह शिंदे गटाच्या एका नेत्याचं नाव असल्याची माहिती आहे. परंतु या प्रकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव वगळण्यात आल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांच्या नावावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आणखी १४ लोकांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.



Source link