Saturday, August 22, 2026
HomeसाताराSatara : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले | पुढारी

Satara : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले | पुढारी

Satara : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले | पुढारी

[ad_1]

महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिन व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच रेलचेल अनुभवायास मिळत आहे. पावसाची रिमझिम बरसात, कडाक्याची थंडी अन् हिरवागार निसर्ग, थंड वातावरण याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. सुट्ट्यांमुळे रिसॉर्ट्स, लॉजिंगचे दर वाढले असून अनेकांनी आधीच रूम आरक्षित केल्याने त्यांना सवलत मिळाली आहे. (Satara)

वर्षा पर्यटनाचा माहोल सर्वत्र अनुभवायास मिळत असून येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत आहे. या दोन्ही धबधब्याचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. तर नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेकसह क्षेत्र महाबळेश्वर मंदिर तसेच वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले प्रेक्षणीय स्थळांवर देखील पर्यटकांची रेलचेल अनुभवायला मिळत आहे.
महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटकांचे माहेरघर असलेल्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी स्वातंत्र्य दिन व सलग सुट्ट्यांमुळे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची रेलचेल अनुभवायास मिळत आहे. हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वर चे रूप पूर्णपणे पालटले असून डोंगर कपारीतून उंचावरून वाहणारे धबधबे, दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. सुखद व रम्य वातावरणाची मजा लुटण्यासोबतच धुवाँधार पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत. (Satara)

वेण्णालेक व परिसर दाट धुक्यात हरवलेला आहे. दाट धुक्यात पर्यटक वेण्णालेक येथे नौकाविहाराचा आनंद घेत आहेत. अनेक हौशी पर्यटक हे घोडेसवारी करताना दिसत आहेत. खवय्ये पर्यटक गरमागरम मका पकोडा, कांदा भजी, मका कणीस, आलेदार चहासह गरमागरम मॅगीचा आस्वाद घेताना पाहावयास मिळत आहेत.

मुख्य बाजारपेठेत गरमागरम चणे, चिक्की फजसोबतच उबदार ब्लँकेट, कानटोपी मफलर येथील प्रसिद्ध चप्पल्स खरेदी साठी पर्यटकांची पाऊले वळत आहेत. अशाही वातावरणात अनेक जण आईस्क्रिम, गोळा खाताना दिसत आहेत. तर अनेकजण स्पिंग पोटॅटो, पावभाजी, मॅग्गी, चायनीजच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत. महाबळेश्वरची शान असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा देखील पर्यटकांना खुणावत असून मुसळधार पावसाने धबधब्याचे नयनरम्य रूप पाहावयास मिळत आहे. दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र संततधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे, ओसंडून वाहू लागेल आहेत.

हेही वाचा 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments